Asha Hospital Kamptee honored with the award as the best hospital of the state government.
The award was presented by the Deputy Chief Minister of the State Shri Devendra Fadnavis.
‘चलो जलाये दीप वहा जहा अभी भी अंधेरा है’ या म्हणीप्रमाणे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत केलेल्या कामाची फलसश्रूती आज महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या बेस्ट हॉस्पिटल चा पुरस्कार आशा हॉस्पिटल कामठी यांना प्राप्त झाला.
जेव्हापासून जीवनदायी योजना सुरू झाली तेव्हापासून आशा हॉस्पिटल ने प्रामाणिकतेने कार्य करीत आहे. गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात मोठमोठे शिबिरे आयोजित करून तेथील गरीब माणसांना मोफत मध्ये शासनाच्या योजनेतून शस्त्रक्रिया करण्याचे अहोभाग्य आशा हॉस्पिटल कामठी ने केले आहे. याच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान प्राप्त झाला.
आशा हॉस्पिटल च्या वतीने डॉ. सौरभ अग्रवाल, डॉ. संजय गडे, श्री. सुमंत टोकेकर, श्री. जयहरीसिंह ठाकुर, श्री देवेंद्र गणवीर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार म्हणजे 100 हत्तीचे बळ देणारा आहे. संपूर्ण रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. MD India यांच्या संपूर्ण टीम चे आभार.